Introduction to Yoga: Health and Benefits


नमस्कार मंडळी

बाल्टिमोर मराठी मंडळाला यावर्षी आपल्या सर्वांसाठी एक नवीन व्याख्यानमालेचा उपक्रम सादर करण्यास अतिशय आनंद होत आहे.

विज्ञान, तंत्रज्ञान, आरोग्य आणि कला अशा विविध क्षेत्रातील तज्ज्ञांना आपल्या पर्यंत घेऊन येणे आणी त्यांचे मार्गदर्शन आपल्याला उपलब्ध करुन देणे हाच या उपक्रमा मागचा प्रमुख उद्देश आहे. या व्याख्यान मालेतील प्रत्येक व्याख्यान ४५ मिनिटांच्या कालावधीसाठी असेल आणि त्यानंतर प्रश्नोत्तरांसाठी वेळ असणार आहे.

या व्याख्यान मालेतील पहील्या व्याख्यान आहे – योग परिचय : आरोग्य आणि त्याचे फायदे

वक्ते – श्री श्रीकांत सबनीस (संस्थापक श्री येाग )

सर्व वयेागटातील लोकांना शिकण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी श्री सबनीसांनी श्री योग संस्थेची स्थापना केली. श्री सबनीस हे आपल्या समाजसेवेबद्दलच्या योगदानासाठी माननीय राष्ट्रपती बायडेन यांच्याकडून जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.

व्हॉईस ऑफ अमेरिकाने श्री योगाबद्दल माहितीपट बनवला –  त्यांच्या संकेतस्थळावर अधिक माहिती उपलब्ध आहे https://www.voanews.com/a/6967311.html


स्थळ – सेंन्ट्रल ब्रांच लायब्ररी – मॅक्सिन व्हाईट वॉरफिल्ड रूम
पत्ता – १०३७५ लिटल पॅटक्सेंट पार्क वे
, कोलंबीया, मेरीलँड २१०४४
तारीख – १९ मार्च २०२३
वेळ – दुपारी, २.४५ ते ४.१५ पर्यत
दिशा – https://goo.gl/maps/VSruyvNMR2uGssK37

प्रवेश – सभासद – विनामूल्य । सभासद नसलेले – विनामूल्य 

कृपया नोंद घ्यावी – या व्याख्यान मालिकेतील या पुढील व्याख्याने केवळ सदस्यांसाठी असतील आणी ती विनामूल्य असतील.


मंडळाचे २०२३ वर्षाचे सदस्य होण्यासाठी विशेष विनंती. 

सवलतीच्या दरातील सदस्यतेची मुदत वाढवुन आता १७ मार्च २०२३ करण्यात आलेली आहे. या संधीचा लाभ घेऊन खालील संकेत वापरा आणि त्वरित सभासद व्हा.

कृपया Paypal ने निधी जमा करताना आपले बँक खाते वापरा, त्याने क्रेडिट कार्ड चा खर्च वाचतो. 

BMM Membership 2023 – Baltimore Marathi Mandal

Please consider subscribing for the latest updates.