मैत्र

नमस्कार मंडळी! मैत्र अंकांसाठी साहित्य पाठवणाऱ्या सर्वांचे मन:पूर्वक आभार! पुढील अंकासाठीही तुम्ही भरभरून साहित्य पाठवत राहाल अशी आशा करतो. maitrabmm.blogspot.com वर अंक ब्लॉगस्वरूपात पाहता येईल व तुम्हाला आवडलेल्या लेखांवर प्रतिक्रियाही लिहिता येतील.

जानेवारी २०२२ अंकापासून चित्रसाहित्य हे नवे सदर सुरू केले आहे. प्रत्येक अंकात ४ छायाचित्रे दिलेली असतील. त्या छायाचित्रांपैकी एक वा अनेक चित्रांवर आधारित असे साहित्य तुम्ही आम्हाला लिहून पाठवायचे आहे आणि ते आम्ही पुढील अंकात प्रकाशित करू. त्यासाठी साहित्यप्रकाराचे बंधन नाही. कविता, वैचारिक/ललित/माहितीपर लेख, अनुभव, स्थलवर्णन, स्फुट विचार, दीर्घ/लघु/भय/रूपक कथा वगैरे कोणत्याही साहित्य प्रकाराचे स्वागत आहे. ह्या उपक्रमाला तुम्ही भरभरून प्रति साद द्याल अशी आशा करतो.

जानेवारी २०२१ अंकापासून पाककृतींचे सादर सुरू केले आहे. संपादक मंडळ एखाद्या पदार्थाचे वा एखाद्या जिन्नसाचे नाव सुचवेल. त्या पदार्थाच्या पाककृती फोटो, आठवणी, अनुभवांसह तुम्ही आम्हाला पाठवायच्या आहेत.

ऑक्टोब२०२० अंकापासून ‘कलाकार ओळख’ हे नवे सादर सुरू केले आहे. पुढील अंकामध्ये नव्या स्थानिक कलाकाराची ओळख सादर करू. तुम्ही एखादी कला जोपासत असाल तर ती लोकांसमोर आणण्यासाठी आम्हाला जरूर संपर्क करा. तुमची कलाकार म्हणून ओळख करून देण्यासाठी तुमच्याबद्दलची माहिती – नाव, कला, व्यवसाय/छंद, कलेची आवड/सुरुवात कधी व कशी झाली, कलेविषयीचे तुमचे अनुभव, विचार, तंत्र, आवड वगैरे माहिती- व सोबत चित्रे पाठवा.

मैत्र हे त्रैमासिक असून अंक दर वर्षी जानेवारी, एप्रिल, जुलै आणि ऑक्टोबर महिन्यांच्या अखेरीस प्रकाशित होतील. अंकांसाठीचे साहित्य अंक प्रकाशित होणाऱ्या महिन्यांच्या १५ तारखेपर्यंत editor@baltimoremarathimandal.org ह्या पत्त्यावर पाठवा.

संपादक मंडळातर्फे सर्वांना हार्दिक लेखन-शुभेच्छा!!

‘मैत्र’ चे आधी प्रकशित झालेले अंक खालती दिलेल्या दुव्यांवर उपलब्ध आहेत

लेखन पाठवण्याविषयी ढोबळ नियम

१. लेखन ‘मैत्र’ च्या पूर्वीच्या अंकांमध्ये प्रकाशित झालेले नसावे. इतरत्र प्रकाशित झालेले लेखन ‘मैत्र’ साठी पाठवताना ते आधी कुठे प्रकाशित झाले होते त्याचा उल्लेख करावा व शक्य असल्यास लिंक द्यावी.
२. लेखन मराठीत असावे. (अपवाद – शालेय वयोगटातील मुलांनी इंग्रजीमध्ये लेखन पाठवले तरी चालेल.)
३. बाल्टिमोर परिसरात राहणाऱ्या लोकांनी लिहिलेल्या लेखनाला प्राधान्य दिले जाईल.
४. साहित्याचा आलेल्या क्रमाने विचार केला जाईल. अंकाची ठरलेली पाने भरल्यानंतर आलेले लेखन पुढील अंकांसाठी विचारांत घेतले जाईल.
५. अंकासाठी पाठवलेली चित्रे (फोटो- ह्यात रेखाचित्रे, छायाचित्रे व कलाचित्रे ह्यांचा समावेश आहे) अंकाचे मुखपृष्ठ व पानांमध्ये भरावासाठी वापरली जाऊ शकतात. प्रत्येक अंकामध्ये किमान दोन चित्रे असतील व गरजेनुसार अधिक चित्रांचा विचार केला जाईल. चित्रासोबत चित्राचे शीर्षक व चित्राबद्दल अधिक माहिती लिहून पाठवावी.
६. मुलांनी पाठवलेल्या (मराठी वा इंग्रजी) साहित्यासाठी कमाल दोन पाने दर अंकामध्ये राखीव असतील. मुलांकडून जास्त प्रमाणात लेखन आल्यास जास्तीच्या साहित्याचा पुढील अंकांसाठी विचार केला जाईल.
७. प्रक्षोभक आणि भावना दुखावणारे लेखन स्वीकारले जाणार नाही.

प्रकाशनाविषयी ढोबळ नियम –
१. पाठवलेल्या लिखाणात आवश्यकतेनुसार किरकोळ बदल करण्याचे अधिकार संपादक मंडळाकडे असतील.
२. संपादक मंडळाला लेखन स्वीकारण्याचे वा नाकारण्याचे अधिकार असतील.
३.प्रकाशित लेखनांतील मते लेखक/लेखिकांची वैयक्तिक मते आहेत. संपादक मंडळ त्या मतांशी सहमत असेलच असे नाही.
४.लेखन पाठवण्याविषयीचे ढोबळ नियम आणि प्रकाशनाविषयीचे ढोबळ नियम गरजेनुसार बदलण्याचे अधिकार संपादक मंडळाकडे असतील.

Maitra

Maitra editorial team wishes you a very happy new year. The new edition of the quarterly newsletter ‘Maitra’ from the year 2020 was published on January 30th.

Three additional issues of ‘Maitra’ will be published this year, these being at the end of April, July and October. Contributions for each issue must be sent to the editors at editor@baltimoremarathimandal.org by the 15th of the respective month.

The executive committees of Baltimore Marathi Mandal and Marathi Kala Mandal, DC are exploring opportunities for collaboration and potentially jointly hosted events in the future. As part of this, we plan to share content between ‘Maitra’ and ‘Hitguj’, which are the respective publications of those two associations. We are beginning this content sharing this month by publishing the movie review for ‘The Irishman – आहे मनोहर तरी… ‘, by Rajan Bapat, which originally appeared in an earlier issue of ‘Hitguj’. Conversely, the short story ‘चिरंजीव’, translated by Varada Vaidya, appearing in the January issue of Maitra will be published in the upcoming issue of ‘Hitguj’ of this year. Beginning with the next issue, an article, a picture or some other contribution from ‘Maitra’ will be published in ‘Hitguj’ as well.

General Guidelines regarding the content

  1. Contributions should be original and new. Please do not submit material that has already been published in previous issues of ‘Maitra’. Contributions that may have appeared in other publications will be accepted for publication in ‘Maitra’ with appropriate citations and sourcing. At a minimum please let us know which publication(s) your contributions have appeared in and when they were published. If possible, a link to the source material would be appreciated.
  2. Submissions should be in Marathi. Exceptions will be made for school-age children, who may send in submissions in English.
  3. Submissions are welcomed from all, however, those from authors residing in the Baltimore metro area will be prioritized above others.
  4. Submissions will be considered on a first-come first-served basis. Submissions that cannot be accommodated due to page limits of each issue of the newsletter will be automatically considered for the subsequent issue.
  5. Any works of art, including but not limited to photographs, drawings, and paintings, that are submitted will be considered for either the cover of an issue or for filler throughout the issue as appropriate and as required.
  6. Submissions from school-age children will be limited to a maximum of 2 pages per issue. Any submissions from school-age children that cannot be accommodated due to page limitations will automatically be considered for the subsequent issue.
  7. Provocative and hurtful content will not be accepted for publication. This includes both written articles as well as artwork.

General Guidelines about the Publication

  1. The editorial board reserves the right to make such minor revisions to submissions as may be necessary to make it suitable for publication without in any way changing the meaning, intent, and/or impact of the submission(s).
  2. The editorial board reserves the right to reject any submission(s) as appropriate.
  3. Editors are not responsible for the content of articles other literary compositions or any artwork that may be sent in and/or published in the publication. The authors of those works are solely responsible for the content and the views and/or opinions expressed are solely their own.
  4. The editorial board reserves the right to make changes to the above guidelines, pertaining to both Content as well as the Publication itself, over time as required.

For more information, contact the editorial team.